ग्रामपंचायत आरोग्य समिती — प्रमुख कामे

आरोग्य सेवा

  • गावातील उपकेंद्र / प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) यांच्या कामावर देखरेख ठेवणे

  • गावातील आरोग्य कर्मचाऱ्यांना (ANM, आशा, अंगणवाडी सेविका) सहकार्य करणे

  • लसीकरण मोहिमेची आखणी, जनजागृती आणि अंमलबजावणी

  • गर्भवती महिला, नवजात बालक, कुपोषित बालक यांच्या तपासणीस मदत करणे

  • कोविड, डेंग्यू, मलेरिया, क्षयरोग यांसारख्या संसर्गजन्य रोगांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करणे

स्वच्छता व पाणीपुरवठा

  • गावात स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करणे

  • पाण्याच्या स्त्रोतांची नियमित तपासणी आणि क्लोरिनेशन

  • कचरा व्यवस्थापन, घन व द्रव कचरा विल्हेवाट योजना राबवणे

  • सार्वजनिक शौचालयांची देखभाल व स्वच्छता राखणे

पोषण आणि जनजागृती

  • अंगणवाडी केंद्रात पोषण आहार वितरणावर देखरेख ठेवणे

  • महिलांच्या व मुलांच्या आरोग्याविषयी जागृती कार्यक्रम आयोजित करणे

  • पोषण सप्ताह, आरोग्य सप्ताह, स्वच्छता सप्ताह इ. साजरे करणे

योजना व निधी व्यवस्थापन

  • ग्रामपंचायतीच्या वार्षिक आरोग्य कृती आराखड्याची आखणी करणे

  • 15वा वित्त आयोग, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) यांतील निधीचा योग्य वापर करणे

  • गाव आरोग्य योजनेसाठी आरोग्य निधीचा वापर कसा करायचा यावर निर्णय घेणे

आरोग्य समिती पदाधिकारी

क्र.सदस्यांचे नावपद
श्री. सतिश लक्ष्मण दिवेकरअध्यक्ष
श्रीम. स्नेहा संदिप दिवेकरसचिव
श्रीम. रोहिणी अशोक निवडुंगेआ. सेविका
श्री. सोहेल हिदायत तांबोलीस.आ. अधिकारी
श्रीम. सपना संदिप दिवेकरअं. सेविका
श्रीम. सुषमा प्रकाश दिवेकरसदस्य
श्रीम. लावण्या लवेश चिलेसदस्य
श्रीम. प्रतिक्षा राजेश दिवेकरसदस्य
श्रीम. स्वप्नाली शशिकांत वाजेसदस्य
१०कु. दिव्या सचिन चिलेसदस्य
११कु. सुहानी सतिश दिवेकरसदस्य
Scroll to Top